राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी आणि पदवीधारकांना नोकरीची हमी!

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी आणि पदवीधारकांना नोकरीची हमी!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि युवकांवर भर देण्यात आला असून
शेतकय्रांना सरसकट कर्जमाफी आणि पदवीधारकांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. तसेच नोटबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या त्याची श्वेतपत्रिका काढणार असल्याचंही राष्ट्रवादीनं म्हटलं केलं आहे.

तसेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देणार असून शेतमजुरांना नरेगा योजनेतून मदत देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीनं या जाहीरनाम्यात दिलं आहे. तसेच शेतीला लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करणार असून शहरातील पदवीधरांना १०० दिवसाची नोकरीची हमी, मुलींना शिशुवर्गापासून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत देणार
असल्याची हमीही यामध्ये राष्ट्रवादीनं दिली आहे.

COMMENTS