संजय राऊतांना भेटून आल्यानंतर  जितेंद्र आव्हाडांनी गायलं हे गाण! VIDEO

संजय राऊतांना भेटून आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी गायलं हे गाण! VIDEO

मुंबई – शिवसेनेचे नेता आणि खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आव्हाड यांनी एक गाण गायलं आहे. हे गाण त्यांनी ट्वीट केलं असून राजकीय वर्तुळात या गाण्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

“तेरी गलियों में रखेंगे न कदम आज के बाद” “जो मुझे मिल गया, वो मेरा अपना था,” असे या गाण्याचे बोल आहेत. आव्हाड यांच्या या गाण्यावरुन शिवसेना आजपासुन भाजपकडे जाणार नाही. तसेच “जो मुझे मिल गया,वो मेरा अपना था,” याचा अर्थ शिवसेना राष्ट्रवादी आता एकत्र आले असून ते माझे जवळचे आहेत असा या गाण्याचा अर्थ मांडला जात आहे. त्यामुळे आता लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार उदयास येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

सरकार स्थापनेसाठी तिन्ही पक्षांमध्ये नवा फॉर्म्युला ठरला असून 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरल्याची माहिती आहे. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच असणार आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह 14 आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदे मिळण्याचे शक्यता आहे. तसेच महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS