छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा !

छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा !

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशभरात कुठेही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जाताना त्यांना तपास अधिका-यांना आपल्या वास्तव्याचा पत्ता द्यावा लागणार आहे. यापूर्वी भुजबळ यांना पूर्वपरवानगीशिवाय देशात कुठेही जाता येत नव्हतं.

दरम्यान अटक होण्यापूर्वी आपण परदेशात होतो आणि आपल्या विरोधात कारवाई सुरु झाली असल्याची माहिती असतानाही मी देशात परत आलो होतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेपासून पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याचा विचार करुन कोर्टानं त्यांना अखेर पूर्वपरवानगीशिवाय देशात कुठेही जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS