राष्ट्रवादीचा नेता पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला

राष्ट्रवादीचा नेता पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला

मुंबई : औरंगाबाद पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून मेहबूब शेख या नावाचा उल्लेख असलेली तक्रार दाखल करण्यात आली. ही व्यक्ती कोण याचा तपास लागण्याआधीच तक्रारीत नाव घेण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेच आहेत, असा दावा भाजपा नेत्यांनी केला. तसेच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आज मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू लागले.

मेहबूब शेख म्हणाले, “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. महिलेच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले, तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये. दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन.”

“मी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना फोन केला. तसेच याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. ज्या महिलेनं हा आरोप केलाय त्यांना मी कधी पाहिलेले नाही. गरज पडली तर मी नाक्रो टेस्ट करायला तयार आहे. 9, 10, 11 डिसेंबरला मी मुंबईत‌ होतो. मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी,” असंही मेहबूब शेख यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले हे देखील उपस्थित होते.\

COMMENTS