पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे अडचणीत !

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे अडचणीत !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून सत्ताधारी या प्रकरणावरुन मुंडे यांना कोंडीत पकडू शकतात असं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण ?

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे.

COMMENTS