राष्ट्रवादीच्या नेत्यानं केलेल्या फेसबुक पोस्टमुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम !

राष्ट्रवादीच्या नेत्यानं केलेल्या फेसबुक पोस्टमुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम !

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा होती. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान या पोस्टमध्ये रणजितसिंह शिंदे यांनी पक्षांतराच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हंटल आहे. काही राजकीय नेतेमंडळी मतदारसंघामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पक्षांतराच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

रणजितसिंह शिंदे यांची फेसबुर पोस्ट

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाच्या काही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहेत. अशाप्रकारच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यामागे काही राजकीय मंडळींचा जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू आहे. तरी शिंदे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की अशाप्रकारच्या सोशल मीडियावरील व्हायरल अफवांवर तिळमात्र विश्वास ठेवू नये तसेच अशा पोस्ट निदर्शनास आल्यास फॉरवर्ड देखील करू नयेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=374346829823177&id=100017435890045

COMMENTS