परभणी – मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा मंगळवारी आठवा दिवस होता. परभणीसह पाथरी, सेलू, याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतल्या. यादरम्यान अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी एका शेतक-याच्या शेतीच्या बांधावर जाऊन हुरडा पार्टी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हुरडा खाऊ घालत शेतकर्यांनी अजितदादा, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परभणी जिल्ह्यातील शेत-यांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला.
सध्या शेतकऱ्यांना बोंड अळी, कर्जमाफी, हमीभाव, भरमसाठ वीज बील वसुली अशा नाना अडचणी सतावत आहेत. या अडचणींचा थेट आढावा घेऊन अजितदादा, तटकरे, मुंडे व इतर नेते सरकारवर तुटून पडत आहेत. पण त्याचवेळी विविध समस्यांमध्ये अडकलेल्या शेतक-यांना आधार देण्यासाठी थेट बांधावर जाऊन राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी पाथरी येथील शेतक-यांची भेट घेतली. त्यावेळी सेलूचे आ. विजय भांबळे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळेही उपस्थित होते.
COMMENTS