मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना बुधवारी रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंडे यांच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनाही आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांच्यावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावरुन चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर मुंडे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून ‘तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये,असं ट्वीट करण्यात आलं आहे.
पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद 🙏
— OfficeofDM (@OfficeofDM2) October 30, 2019
तसेच मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु मुंडे यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद,” असे ट्विट ऑफिस ऑफ डीएम म्हणजेच धनंजय मुंडेच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले आहे.
COMMENTS