या कारणामुळे राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला स्थगिती

या कारणामुळे राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला स्थगिती

मु्ंबई :राष्ट्रवादीच्या पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने विदर्भ, खानदेशमध्ये जिल्ह्याजिल्ह्यांत दौरे करत आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेनेही शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. तसेच इतर पक्षांनी आपले पक्ष विस्ताराची मोहिम हाती घेतली. दरम्यान, आजपासून अचानक राष्ट्रवादीने संवाद अभियान स्थगित केले आहे. त्त्सयांचलेले राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना करोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. आतापर्यंत त्यांनी विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे असा त्यांचा कार्यक्रम होता. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या वाढ आहे. प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

आज जयंत पाटील यांनी ट्विट करून ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली करोना चाचणी करून घ्यावी,’ अशी विनंती त्यांनी केली आहे. ‘जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळं जयंत पाटील हे पुढील काही कालावधीसाठी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांचे सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

COMMENTS