गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य ?, जितेंद्र आव्हाडांचा संभाजी भिडेंवर निशाणा !

गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य ?, जितेंद्र आव्हाडांचा संभाजी भिडेंवर निशाणा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर टीका करणारा एक ट्विट केलं आहे. फोटो ट्विट करुन आव्हाडांनी संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे. गुरूजी असे कसे हो तुमचे शिष्य? अविनाश पवार ह्यांनी मला ठार मारण्याची तयारी केली होती, अगदी घरापर्यंत येऊन गेला होता. सांगलीत तुमच्या शिष्याने जीवघेणा हल्ला केला हीच का तुमची शिकवण? असा प्रश्न आव्हाड यांनी भिडे गुरुजींना केला आहे.

दरम्यान एटीएसने अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांचेही नाव होते अशी माहिती एटीएसने कोर्टात दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हा फोटो ट्विट करत संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे.

 

COMMENTS