उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला धक्का, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश !

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला धक्का, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश !

उस्मानाबाद – आगामी निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. माजी जि प सदस्या तथा भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कांचनमाला संगवे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश आहे. काचनमाला संगवे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.


दरम्यान कांचनमाला संगवे या गेल्या आनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय होत्या. त्यांनी जिल्हा परिषद तसेच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातुन विवीध विकासकामे केली आहेत. संगवे यांच्या पक्ष प्रवेशाने उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघासह उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेला बळ मिळाले आहे. संगवे यांचा पक्षप्रवेश मंबई येथे झाला असून यावेळी संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत ,सहसंपर्कप्रमुख आनिल खोचरे,माजी आ ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हाप्रमुख कैलास पाटिल ,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतिष सोमाणी,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.

COMMENTS