मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतक राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे.
महाले यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे.
दरम्यान महाले यांनी राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु धनराज महाले यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव झाला. त्यामुळे
आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाले हे आगामी विधानसभा निवडणूक दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS