राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा खंदा समर्थक शिवसेनेत!

राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा खंदा समर्थक शिवसेनेत!

अहमदनगर – निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे मात्र पक्षातराचे वारे अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. कारण अजूनही काही नेते या पक्षातून च्या पक्षात उडी घेत आहेत. अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

दरम्यान अभिषेक कळमकर हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यात हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. कळमकर यांना या कार्यक्रमानंतर धक्काबुक्कीही झाली होती. त्यानंतर आता अखेर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कळमकर यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS