राष्ट्रवादीच्या माजी खासदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये जाणार ?

राष्ट्रवादीच्या माजी खासदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये जाणार ?

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरमधून पराभूत झालेले माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे धनंजय महाडिकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. परंतु कारखान्याच्या कामासाठी ही भेट घेतली असल्याचे महाडिकांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे गतवेळचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तुल्यबळ सामना रंगला होता. यामध्ये महाडिक यांनी ३३ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या वेळी याच दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली, त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनविला होता.

या पराभवानंतर आज माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे धनंजय महाडिकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. परंतु कारखान्याच्या कामासाठी ही भेट घेतली असल्याचे महाडिकांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS