मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का बसला असून काही दिग्गज नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीतील आणखी नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राहुल मोटे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आज या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी सोडणार नसल्याची या दोन्ही नेत्यांनी पवारांना ग्वाही दिली आहे. आपण पक्ष सोडणार असल्याच्या अफवा असल्याचं मोटे आणि पाटील यांनी पवारांना म्हटलं आहे.
COMMENTS