मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याबाबत ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु असताना पवार घराण्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भेट घेतली. बुलडाण्यात या युवा नेत्यांनी जवळपास एक तास चर्चा केली.
दरम्यान या बैठकीत बुलडाण्याच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले बरोबरच बुलडाणा आणि वर्धा जागेची मागणी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी स्वाभिमानीने बुलडाण्याची जागा मागितली आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून येथून डॉ.राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या भेटीनंतर बुलडाण्याच्या जागेचा हट्ट स्वाभिमानी सोडणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS