राष्ट्रवादीचा मेता म्हणतो, “आघाडीचा पराभव झाला तर काँग्रेसच जबाबदार!”

राष्ट्रवादीचा मेता म्हणतो, “आघाडीचा पराभव झाला तर काँग्रेसच जबाबदार!”

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर सर्वच माध्यमांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा यनतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे आघाडीचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते माजिद मेमन यांनी जर राज्यात आघाडीचा पराभव झाला तर त्याला जास्त जबाबदार काँग्रेस असेल, असं वक्तव्य केलं आहे. आम्हाला जर निवडणुकीत यश मिळालं नाही तर पराजय होण्याला काँग्रेस जास्त जबाबदार असल्याचंं मेनन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवारांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेसकडून नरमी दाखवण्यात आली. राहुल गांधींनी मुंबईत काही दौरे केले, पण काँग्रेस नेत्यांनी खास मेहनत केली नाही. जर आम्हाला यश मिळालं नाही, तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल,’आकडे येतील, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. २४ तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. पण कुठे ना कुठे पराभवाची जबाबदारी आमचीही असेल असंही मेनन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS