तुमच्या खासदाराला आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडतो, शरद पवारांना बड्या नेत्याचा इशारा!

तुमच्या खासदाराला आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडतो, शरद पवारांना बड्या नेत्याचा इशारा!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं इशारा दिला आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा इशारा दिला असून
खासदार उदयनराजेंना सांभाळायचे असेल त्यांना कंट्रोल करा नाहीतर आम्हाला बाहेर पडायची परवानगी द्या असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा भडकले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान खासदार उदयनराजे यांच्यासह निंबाळकर यांनी, खा.रणजित निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरेंवरही जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत तोपर्यंत माझी भूमिका सुध्दा पिसाळलेलीच असेल. तसेच शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे त्यात त्यांना सांगणार आहे तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

COMMENTS