रायगड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला असून रायगडमधील राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिला आहे. प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचं प्रकाश देसाई यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आहे.
दरम्यान या दोन्ही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन जोरदार धक्के बसले आहेत.
रायगड जिल्ह्यात प्रकाश देसाई यांची राजकीय ताकद प्रभावी आहे. त्यामुळे प्रकाश देसाई हे राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्यास तटकरेंना फटका बसू शकतो. तसेच बॅ. ए. आर. अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे अंतुले कुटुंबाची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे नविद अंतुले हे शिवसेनेत गेल्यास सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठं आव्हान निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS