राष्ट्रवादीच्या आमदाराचा अखेर राजीनामा, शिवसेनेत जाण्याची घोषणा !

राष्ट्रवादीच्या आमदाराचा अखेर राजीनामा, शिवसेनेत जाण्याची घोषणा !

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर केली आहे. येत्या 28 ऑगस्टला दुपारी 1 वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोपल यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ती आज अखेर खरी ठरली असून सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. बार्शीची राजकीय परिस्थिती पाहता आपण हा निर्णय घेत असल्याचं दिलीप सोपल यांनी म्हटलं आहे. आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघातून ते आगामी निवडणूक लढवणार आहेत.

COMMENTS