जितेंद्र आव्हाडांना धक्का, ठाण्यातील ‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचा राजीनामा!

जितेंद्र आव्हाडांना धक्का, ठाण्यातील ‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचा राजीनामा!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा पुतण्या आणि ‪राष्ट्रवादीचे श्रीवर्धन येथील आमदार अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशातच ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. परंतु जगदाळे हे कोणत्या पक्षात जाणार हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे त्यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यशैलीवर काही नगरसेवक नाराज आहे. जगदाळे यांचेही नाव या नाराज नगरसेवकांमध्ये घेतले जात होते. मे 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे हे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेले होते. आव्हाड यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर आता जगदाळे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

COMMENTS