राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, शरद पवार यांना लिहिलं पत्र!

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, शरद पवार यांना लिहिलं पत्र!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वाघेला यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं असून यात त्यांनी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्याने शंकरसिंह वाघेला नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान शंकरसिंह वाघेला यांनी 2019 च्या निवडणुकांवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह अहमदाबादहून मुंबईत येऊन त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. परंतु आज अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वाघेला हे यापूर्वी 1970 ते 1996 अशी तब्बल 26 वर्षे भाजपमध्ये होते. त्यानंतर 1998 ते 2017 अशी 19 वर्षे ते काँग्रेसमध्ये होते.त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहण गरजेचं ठरणार आहे.

COMMENTS