मुंबई – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु राष्ट्रवादीतील गळती मात्र थांबत नसल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुलानेही याबाबत भाष्य करत रामराव वडकुते हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे.त्यामुळे हिंगोल मतदारसंघात आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षानं उमेदवारी दिली नसल्यामुळे ते नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ते १५ ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर त्यांचे एक छायाचित्र समाजमाध्यमातून पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. परंतु आता त्यांचे पुत्र शशिकांत वडकुते यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
COMMENTS