मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. साताय्रातील आमदार शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा गट लवकरच भाजपच्या गोटात सामील होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रामराजे निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची राज्यात सध्या महाजनादेश यात्रा सुरु आहे. ही यात्रा साता-यात देखील येणार आहे. त्यामुळे या आधीच रामराजेंचा गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून निंबाळकर हे राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याचे राजकारण लक्ष्मणराव पाटील आणि रामराजे ना. निंबाळकर या दोन नेत्यांच्या हातात दिले. लक्ष्मणराव पाटील यांना बरोबर घेवून रामराजेंनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु आता रामराजे भाजपात गेले तर साताय्रातील राष्ट्रवादीचा गड कोसळणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS