नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे 9 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी संदीप नाईक यांनी कमळ हाती घेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावेळी संदीप नाईक यांना नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईकही भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादूला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे 50 आणि पाच अपक्ष नगरसेवक मिळून आज वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती आहे. हे नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन करणार आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचं दिसत आहे. त्यानंतर 9 तारखेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशीत होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात नाईक भाजपात जाहीर प्रवेश करणार आहे.
COMMENTS