पंढरपूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पंढरपुरातील करमाळा तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत जाण्याबाबत बागल यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. या बैठकीत त्या शिवसेनेत जाण्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर त्या आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे बागल यांच्या सोमवारी होणाय्रा बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान रश्मी बागल-कोलते या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत.लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. तसेच बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलं आहे जय महाराष्ट्र’असे स्टेटस फेसबुकवर ठेवलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे बागल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.
त्यामुळे बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहेत.
COMMENTS