मोठ्या गुन्हेगारांना, डीएसकेंना, खासगी रुग्णालयात उपचार मिळतो, मग भुजबळांना का नाही ? विधानपरिषदेत विरोधकांचा सवाल !

मोठ्या गुन्हेगारांना, डीएसकेंना, खासगी रुग्णालयात उपचार मिळतो, मग भुजबळांना का नाही ? विधानपरिषदेत विरोधकांचा सवाल !

मुंबई – विधानपरिषदेत आज भुजबळांबाबत विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. आमदार कपिल पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच जे जे रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं असल्याचही कपिल पाटील यांनी म्हटलं असून गेली 2 वर्ष त्यांना जामीन का मिळत नाही असा सवाल कपील पाटील यांनी केला आहे.

दरम्यान ओपीडीच्या लाईनमध्ये भुजबळ यांना उभे राहावे लागले आहे. ईसीजीचा रिपोर्ट अबनॉर्मल आला असतांना रुग्णालय त्यांना परत ऑर्थररोड जेलमध्ये पाठवत आहे. त्यामुळे प्रशासनाला भुजबळ यांना संपवायचे आहे का ? तसेच  खाजगी रुग्णालयात त्यांना उपचाराची परवानगी का मिळत नाही असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच डीएसके, मोठमोठ्या गुन्हेगारांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळते. भुजबळ यांना का मिळत नाही. माणुसकी म्हणून विचार करा. असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच जयवंत जाधव यांनी भावनाविश होऊन, हालाकीच्या परिस्थितीमध्ये हा माणूस जगत आहे. माजी उपमुख्यमंत्री नाही, मंत्री नाही , तर निदान सभागृह सदस्य म्हणून तरी विचार करा असं म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना सभागृह नेते, चंद्रकात पाटील यांनी कायद्याच्या चौकटीत राहून जे जे करता येईल ते भुजबळ यांच्याबाबतीत करू असं म्हटलं आहे.

 

COMMENTS