मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकला आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही माहिती आहे. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भारतीय सैन्याने केलेल्या या कामगिरीमुळे देशभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हवाई दलाने केलेली कारवाई अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.
छगन भुजबळ – गेले काही वर्षे जैश मोहम्मद व आतंकवादी हे सीमेवर व काश्मीरवर दहशतवादी हल्ला करतायत. नुकतेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवानांचे प्राण घेतले, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे ही संपूर्ण देशाची मागणी होती. आजची हवाई दलाने केलेली कारवाई अभिमानास्पद जवानांचे धैर्याबाबत सर्वांनीच अभिनंदन केले पाहिजे.
जयंत पाटील – मी भारतीय वायूसेनेचे अभिनंदन करतो. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवादी तळ उध्वस्त करण्याचं काम वायू दलाने केलं.पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न जीवनात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी इंदिरा गांधीने पाकिस्तानमधून बांगलादेशला स्वतंत्र करून पाकिस्तानला धडा शिकवला. अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडून एकसंघ काश्मीर करण्याची संधी भारतासमोर आहे.यामुळे काश्मीरचा सतत येणारा प्रश्न सुटेल. यासाठी भारतीय सेना समर्थ आहे.पाकिस्तानला धडा शिकवण्याचा काम स्वागतार्ह आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय वायूदलाने केलं आहे, याबाबत भारतीय वायूसेनेचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी अभिनंदन केले. #AirSurgicalStrikes #IndianAirForce #IndiaStrikesBack pic.twitter.com/0W1E3f7J8i
— NCP (@NCPspeaks) February 26, 2019
अबू आझमी – मोदी यांनी याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका याच संपूर्ण श्रेय जवानांना जातं. अबू आझमी यांनी तिरंगा फडकवून पेढे वाटून केले भारतीय हवाई दलाच केलं स्वागत.
जितेंद्र आव्हाड – 1956 युद्ध असो 1971 युद्ध असो या पाकिस्तानच्या सैन्याला कमी लेखण्याची काम करू नये. भारतीय सैन्याने बालकोट मोजफराबाद येथील तळ उद्धवस्त केले. बालकोट तो सिर्फ झाकीहै अब इम्रान खान बाकी है. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी संघटनांच्या तळांवर केलेल्या कारवाईबद्दल @IAF_MCC चं अभिनंदन! जेव्हा आमच्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहतं, तेव्हा सव्वाशे कोटी देशवासी एकत्र येऊन चोख उत्तर देतात, असा संदेश आपण जगाला दिला आहे. जवानांच्या शौर्याला सलाम!#IndianAirForce pic.twitter.com/cn0d0yltrW
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 26, 2019
COMMENTS