“खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता साताय्राचे नावही बदला”, राष्ट्रवादी आमदाराच्या समर्थकांचा राजीनामा!

“खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता साताय्राचे नावही बदला”, राष्ट्रवादी आमदाराच्या समर्थकांचा राजीनामा!

मुंबई – आज महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात काँग्रेस,
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना डावल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देणार आहेत.

दरम्यान वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आज, सोमवारी आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह याठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारीही आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. सोमवारी सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व जण आत्मक्लेश आंदोलनही करणार आहेत.

खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता सातारा जिल्ह्याचे नाव ही बदलून टाका, अशा शब्दात कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.

लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

COMMENTS