राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत उदयनराजेंसह 11 उमेदवारांची नावं निश्चित ?

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत उदयनराजेंसह 11 उमेदवारांची नावं निश्चित ?

नवी दिल्ली  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे.  शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली जाण्याचे संकेत दिले आहेत. माढा मतदारसंघ शरद पवारांनी फायनल केल्यामुळेच उदयनराजेंना सातारामधून ग्रीन सिग्नल दिली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान लोकसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी तयार झाली असून पहिल्या यादीत असलेल्या 11 मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याचीही माहिती आहे. या यादीत विद्यमान 5 खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असल्याची माहिती असून बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचं नाव निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नाशिकमधून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीने मित्रपक्षाला जागा सोडली असून या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान इतरही काही उमेदवारांची नावं लकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.

पहिल्या यादीतील नावं

1) बारामती – सुप्रिया सुळे

2) रायगड – सुनील तटकरे

3) सातारा – उदयनराजे भोसले

4) माढा-विजयसिंह मोहिते-पाटील

5) कोल्हापूर – धनंजय महाडिक

6) बुलढाणा – राजेंद्र सिंगणे

7) नाशिक – समीर भुजबळ

8) ठाणे – संजीव नाईक

9) उस्मानाबाद – अर्चना पाटील / राणा जगजित

10) ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

11) हातकणंगले – राजू शेट्टी

12) गोंदिया – वर्षा पटेल / मधुकर कुकडे

COMMENTS