मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी ही अत्यंत महत्त्वाच्या बैठक असणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीला आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्यातील फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून या बैठकीत मोर्चेबांधणी केली जाणार आहे. प्रत्येक नेत्याला त्यांच्या भागातील दुष्काळाची माहिती घेण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तसंच दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही विचारमंथन करण्यात येणार आहे. दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न या मुद्यावरुन सरकारला लक्ष्य करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS