अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, ‘या’ नेत्यांनी घेतली बैठक!

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, ‘या’ नेत्यांनी घेतली बैठक!

मुंबई – आजचा अधिवेशनाचा दिवस चांगलाच वादळी ठरत आहे. विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होणार आहे.

त्यामुळे अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली आहे. राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत दिवसभरातील कामकाजाची रणनीती आखण्यात आली आहे. तसंच विधानपरिषद सभापतींवर अविश्वास ठराव आणण्याच्या भाजपच्या खेळीला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केली जाणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवसही चांगलाच वादळी ठरणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS