मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. याच बैठकीमध्ये लोकसभेचे काही उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा, माढा, कोल्हापूर या जागांबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यनंतर दोन्ही काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठीकमध्ये जागावाटपाबबत चर्चा होणार आहे. कोणी किती जागा लढवायच्या, मित्र पक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणत्या आणि किती जागा सोडायच्या याबातही चर्चा होणार आहे. गेल्यावेळी लढवलेल्या काही जांगामध्ये आदलाबदल होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
COMMENTS