राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” मंत्र्याचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली – केरळ उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री थॉमस चंडी यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर बांधकाम केल्याचा ठपका चंडी यांच्यावर आहे.
चंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात आहेत. आता केरळमध्येही पक्षाच्या मंत्र्याचे हात बेकायदेशीर कारवायांत बरबटले असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. सत्तेत आल्यापासून डावी लोकशाही आघाडीच्या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

वाहतूक मंत्री चंडी यांच्या कंपनीने बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून पार्किंग परिसरात बांधकाम केले आहे, असे आरोप आहेत. शिवाय, अलाप्पुझ्हा जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी चंडींनी भाताच्या शेतीतून रस्ता तयार केला आहे, असाही आरोप आहे. चंडींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने सुनावणी देत चंडींची कानउघडणी केली. त्यानंतर आज त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

 

COMMENTS