रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलासा मिळाला असून आमदार सुरेश लाड यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवणार इसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान लाड यांना पक्षाकडून उमेदवारी निश्चित होती. मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढविण्यास अचानकपणे नकार दिला. सोमवारीच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र शिवसेनेकडून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या चर्चाना पुर्णविराम मिळाला. मात्र बुधवारी सकाळी आमदार लाड यांची कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षाच्या पदाधिका-यांना मोठा धक्काच बसला होता. आमदार लाड यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली होती.
COMMENTS