संभाजी भिडेंच्या वेशभूषेत विधिमंडळात अवतरले राष्ट्रवादीचे आमदार !

संभाजी भिडेंच्या वेशभूषेत विधिमंडळात अवतरले राष्ट्रवादीचे आमदार !

नागपूर –  आजपासून नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच गाजला असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांची वेशभूषा केली असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केलेली वेशभूषा अधिवेशनादरम्यान चर्चेचा विषय ठरला आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी गजभिये यांनी ही वेशभूषा केली होती.

दरम्यान यावेळी आमदार गजभिये यांनी निषेध म्हणून विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आंब्यांचेही वाटप केले. गजभिये यांनी केलेल्या या वेशभूषेमुळे या अधिवेशनात संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पहिल्याच दिवशी गजभिये यांनी केलेल्या या वेशभषेमुळे विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरुन धारेवर धरण्यासाठी जोरदार तयारी केली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS