मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे. तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची नियुक्ती केली आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदावर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी उपाध्यक्षपदाची जबाबदारी नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान नरहरी झिरवळ
हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभेच्या 2004च्या निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे. त्यामुळे लवकरच त्यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS