सातारा – लोकसभा व विधानसभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेस व काँग्रेसचे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या आमदारांला १०० कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले,”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले,”त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS