मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही दिवासांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान तटकरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना भवनाकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते आता लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याचं दिसत आहे. सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अवधूत तटकरे यांनी पक्ष सोडला असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS