मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला आहे. आज सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पण अजित पवार यांनी कोणत्या आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा दिला, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
दरम्या अजित पवारांना पाठिंबा देणाय्रा काही आमदारांची नावे समोर आली आहेत. राष्ट्रवादीचे मोठे नेते धनंजय मुंडे हेदेखील पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे ते अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. राजेंद्र शिंगणे, अनिल भाई दास पाटील, संदीप क्षीरसागर, नरहरी झिरवळ – दिंडोरी, दिलीप बनकर – निफाड, माणिकराव कोकाटे – सिन्नर या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी या आमदारांनी पक्षातून बंडखोरी केल्याचं चित्र आहे. तसेच आणखी काही आमदारही अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
COMMENTS