राष्ट्रवादीला दुसरा धक्का, ‘या’ आमदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, लवकरच भाजपात जाणार ?

राष्ट्रवादीला दुसरा धक्का, ‘या’ आमदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, लवकरच भाजपात जाणार ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.आमदार पिचड यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेटीवेळी नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान वैभव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीची चर्चा रंगली होती.परंतु माझी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे अन्य कोणत्या पक्षात जाण्याचा विचार या जन्मात तरी माझ्या डोक्यात येणार नसल्याचं मधुकर पिचड यांनी म्हटलं होतं. परंतु आता त्यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

COMMENTS