भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला धक्का!

भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला धक्का!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतु त्यापूर्वीच या आमदाराला धक्का बसला असल्याचं दिसत आहे. भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांना हा धक्का बसला असून विधानसभेला ते भाजपकडून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करू, असा इशारा युतीत सामील असलेल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्यापूर्वीच शिंदे यांना शिवसेनेकडून जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे यावर आता ते कोणता निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान सावंत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आगामी विधानसभेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पुनरावृत्ती घडवून शिंदेंना पराभव चाखायला लावण्याची हीच वेळ असल्याचं शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच माढ्याची जागा ही शिवसेनेची आहे. आम्ही ती कोणत्याही स्थितीत भाजपला सोडणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही याची कल्पना देण्यासाठीच हा मेळावा घेतला आहे. आमदार शिंदे यांना पायउतार करण्याची हीच वेळ आहे. शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. आम्हाला अपयश आले तरीही घराघरात शिवसेना पोहोचवली. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

COMMENTS