राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, भाजपमध्ये जाणार?

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, भाजपमध्ये जाणार?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बस‌णार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करणार आहेत. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान आमदार शिंदे हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी भाजप उमेदवार मुलाखतीसाठी आलेल्या मंत्री राम शिंदे यांची सुध्दा भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडेही आमदार शिंदे यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची घोषणा करतील असं बोललं जात आहे. परंतु भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोध करणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मुलाखतीला न आलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देण्याचे संकेत मंत्री राम शिंदे यांनी दिले होते.त्यामुळे शिंते काय घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS