“मला डावलण्याचं कारण सांगा”, राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?

“मला डावलण्याचं कारण सांगा”, राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?

पुणे – राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व जास्त आहे. त्यांचे नेतृत्व पक्षाला मोठं वाटलं असेल. मला डावलण्याचं कारण पक्षाने सांगावं?, असा सवाल
बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके
यांनी केला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे प्रकाश सोळंके नाराज झाले असून ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सोळंके यांची नाराजी पक्ष दूर करणार का हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान मला राजकारणाचा किळस आला आहे. मला का डावलण्यात आले हे पक्ष सांगेल. पक्षाने हा निर्णय घेतल्याने तो योग्य असेल. मला मात्र राजकारणाचा वीट आल्याने मी हा निर्णय घेतला असल्याचंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे. तसेच मी पक्षाबद्दल नाराज नाही. राजकारण आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं. त्याची उदग्निता आली. मात्र मी पक्ष सोडणार नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाचं काम करेन, असंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोळंके यांनी राजीनामा दिला तर बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS