मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षातून बाहेर पडलेले तारिक अन्वर यांच्याकडे यापूर्वी होते. त्यानंतर आहा हे पद सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच धनंजय महाडिक यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान पक्षाची बाजू संसदेत मांडण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली असून सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या आहेत,तर त्या त्यापूर्वी त्या राज्यसभेवर निवडल्या गेल्या होत्या. लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारणे यासाठी सुप्रिया सुळे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
COMMENTS