राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण !

राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण !

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. फौजिया खान यांच्या अँटीजन टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना तातडीने तपासणी करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे..

दरम्यान फौजिया खान या गेल्या चार महिन्यांपासून परभणीतील त्यांच्या निवासस्थानी राहत आहेत. त्या कुठेही बाहेर पडल्या नव्हत्या. परंतु गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे
त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांचाही स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

कोण आहेत फौजिया खान?

फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यातच त्यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद भूषवले आहे. फौजिया खान याआधी दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत.महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला आहेत.

COMMENTS