शिवसेनेचा एक मंत्री कामकाजातून गायब, विरोधकांनी गैरहजेरीबाबत केला प्रश्न उपस्थित !

शिवसेनेचा एक मंत्री कामकाजातून गायब, विरोधकांनी गैरहजेरीबाबत केला प्रश्न उपस्थित !

नागपूर – नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विरोधकांनी विधीमंडळात चांगलाच गदारोळ केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. शिवसेनेचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत अधिवेशनादरम्यान गैरहजर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीबाबतचा मुद्दा उचलत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. डॉ. दीपक सावंत हे दोन आठवडे अधिवेशनात येणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दीपक सावंत यांच्या गैरहजेरीबाबत काही सवाल केले आहेत.

दरम्यान आरोग्य विभागावरील प्रश्नांची उत्तरं देताना राज्यमंत्री विजय देशमुख यांची अडचण होत असल्याचं दिसून आलं आहे.तसेच विजय देशमुख यांना काही प्रश्नांची उत्तरं देता न आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून उत्तरं द्यावी लागली आहेत. तसेच विरोधकांनी विविध विषयांवर आवाज उठवत आज सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असल्याचं अधिवेशनादरम्यान पहावयास मिळालं आहे.

COMMENTS