मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर सामान्य घरातील तरुणांना संधी देण्यात आली आली आहे. मेहबूब शेख यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सूरज चव्हाण आणि रविकांत वरपे यांची युवक राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या या पहिल्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दिग्गज नेत्यांच्या मुलांना वगळून पहिल्यांदाच घरात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य घरातील तरुणांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटकरत माहिती दिली आहे
मेहबुब शेख
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात तरुणांना संधी देणार असल्याचं अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानुसार सामान्य घरातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
रविकांत वरपे
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष असणारे संग्राम कोलते यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे लोकसभेपूर्वीच नवीन चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती, मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर युवकांची फळी सांभाळण्याची जबाबदार मेहबुब शेख यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच पुढील काळातही राष्ट्रवादीमध्ये बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.
सूरज चव्हाण
COMMENTS