नवी मुंबई – राष्ट्रवादीकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? (१/१) pic.twitter.com/8vNIqwFwys
— Shashikant Shinde (@shindespeaks) October 13, 2020
दरम्यान चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपा ची ?
(१/२)— Shashikant Shinde (@shindespeaks) October 13, 2020
तसेच सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? असा सवालगी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे.
(१/३)— Shashikant Shinde (@shindespeaks) October 13, 2020
COMMENTS