मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.आमचे 48 खासदार निवडून येतील, असा दावा लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं का? त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते घडत नाही. ते स्वत:च निवडणुकीत दोन जागांवर पराभूत झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आमचे आमदार का असतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या लाखोंच्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. यावर आता राष्ट्रवादीनेही आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.आमचे 48 खासदार निवडून येतील, असा दावा लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं का? त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते घडत नाही. ते स्वत:च निवडणुकीत दोन जागांवर पराभूत झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आमचे आमदार का असतील, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. त्यामुळे आबेडकरांचं वक्तव्य खरं ठरणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS